ज्वारीचं आहारातील महत्त्व.

ज्वारीचं आहारातील महत्त्व.

०१.
ज्वारीचं आहारातील महत्त्व.

आपल्या देशात ज्वारीचं पीक अमाप येतं आणि त्यातलं ५० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं. आजही खेडोपाड्यात ज्वारीची भाकरी हेच लोकांचं प्रमुख अन्न आहे. जगभरातल्या प्रमुख धान्यांमध्ये गहू, तांदूळ, मका आणि बार्लीनंतर ज्वारीचा पाचवा नंबर लागतो.

०२.
मोठ्या प्रमाणावर लोह.

इतर धान्यांशी तुलना केली, तर ज्वारीमध्ये खूप जास्त तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे कोठा साफ राहतो. पोट भरल्यासारखं वाटून भूक कमी लागते आणि आपोआप आहारावर नियंत्रण येतं. याचा वजनावर सकारात्मक परिणाम दिसू लागतो. तंतूमय पदार्थ जास्त असल्यानं कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.ज्वारीत मोठ्या प्रमाणावर लोहदेखील असतं. वनस्पतीमधील लोह त्यातील तंतूमय पदार्थ आणि फायटेटसमुळे शरीराला सहज मिळू शकत नाही. यावर सोपा उपाय म्हणजे हुरड्यावर लिंबू पिळणं. लिंबातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे लोह सहजपणे शरीरात शोषलं जातं.

०३.
शक्तीवर्धक.

ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ते शक्तीवर्धक असतं. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याची क्षमता जास्त असते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांना ज्वारी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. ग्लायसेमिक इंडेक्स आपण पदार्थ कुठल्या स्वरुपात खातोय यावरही अवलंबून असतो. उदा. अख्खी ज्वारी खाण्यापेक्षा त्याचं पीठ मधुमेहींसाठी जास्त चांगलं! नुसती ज्वारीची भाकरी न खाता ज्वारी, नाचणी, बाजरी आणि सोयाबीन समप्रमाणात घेऊन मिश्र पिठाची भाकरी करता येऊ शकते. ज्वारीत मॅग्नेशियम, कॉपर आणि नायसिनदेखील असतं. शिवाय, ‘ब’ गटातील जीवनसत्त्वंही असतात. ही सर्व पोषक तत्त्वं आणि लोह मिळून शरीराचं चयापचय सुधारण्याचं काम करतात.

०४.
ग्लुटन फ्री फूड.

गव्हाप्रमाणे ज्वारीत ग्लुटन नसतं. म्हणून ज्वारीला ‘ग्लुटन फ्री फूड’ म्हटलं जातं आणि ते काही प्रकारच्या विकारात फायदेशीर ठरतं. सेलियेक स्प्रू, ऑटिझम, इरिटेबल बाउल सिंड्रोम अशा विकारात ग्लुटन फ्री आहाराचा फायदा होताना दिसून येतो. यात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने त्याचा उपयोग हृदयविकार आणि कर्करोग होऊ नये म्हणूनही करता येतो.

०५.
स्वस्त आणि पोषक.

आरोग्यदायी खाणं महाग आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं; पण निसर्गाने आपल्याला कितीतरी स्वस्त आणि पोषक असे पदार्थ दिलेले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून महागडी फूड सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा आपल्याकडे जे मुबलक आहे त्याचा वापर करणं जास्त शहाणपणाचं आहे.

Gluten Free Diet

Like most websites gluten free diet uses cookies. In order to deliver a personalized, responsive service and to improve the site, we remember and store information about how you use it. This is done using simple text files called cookies which sit on your computer.